आज २०१५ संपणार! नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी एकदा सिंहावलोकन करणे गरजेचे म्हणून हा खटाटोप! जानेवारी राजगड वारी बालेकिल्ल्यावर तंबू ठोक...



आज २०१५ संपणार! नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी एकदा सिंहावलोकन करणे गरजेचे म्हणून हा खटाटोप!

जानेवारी राजगड वारी बालेकिल्ल्यावर तंबू ठोकून राहण्याचे स्वप्नपूर्ती! मग एक छोटी roadtrip ज्यात आम्ही गेलो सुधागड, सुरगड, अवचित आणि घोसाळा…
फेब्रुवारी मध्ये खूप फेऱ्या मुंबईला… ट्रेक म्हणावे तसे काही नाही: सिंहगड आणि तोरणा, परत एकदा राजगड आणि यांना जोडणारा राजगड तोरणा…
मार्च मध्ये खूप वेळा सिंहगड… आणि एक लांब वरची roadtrip बदामी, पट्टदक्कल आणि ऐहोळे.
एप्रिल मध्ये खूप उनाडक्या आणि परत खूप वेळा सिंहगड… एवेरेस्ट बेस कॅम्प वर झालेल्या भूकंपाने झेनिथ ओडिसिस पण हादरले!
मे मध्ये एक मूर्खपणा (जो मला आयुष्यभर भोवणार आहे अशी) औरंगाबाद ची roadtrip!
मग एक हिमालयन ट्रेक. हिमालयातून परतल्यावर २४ तासात सह्याद्रीच्या भेटीला कोकणदिवा ट्रेक.
जुन मध्ये विश्रामगड (कुर्डूगड) आणि अजून एक मूर्खपणा आणि दिल्लीवारी… मग रायरेश्वर वर धुक्यात हरवण्याचा अनुभव…
जुलै मध्ये संतोषगड आणि वारुगड, अंधारबन, आणि चावंड कुकडेश्वर
ऑगस्ट मध्येनाशिक ची roadtrip आणि जुन्या मित्रांची झालेली नवीन ओळख
मग एक  eye opener! आणि मंगळगड.
सप्टेंबर मध्ये पुनश्च: कळसुबाई, गोरखगड, मल्हारगड,
ऑक्टोबर मध्ये राजगड आणि रायगड
नोव्हेंबर ची सुरुवातच हरिश्चंद्रगडावर,  जीवधन नाणेघाट, मोरगिरी आणि घनगड तैलबैल चा सोलो राइड आणि ट्रेक.
डिसेम्बर मध्ये गुप्त सह्याद्री ला एक भेट आणि पुन्हा एकदा सुधागड…

हे वर्ष खूप काही शिकवून गेले, आपली माणसे आपली नसतात हे हि कळाले, परकी माणसे परकी नसतात हे हि अनुभव आले.

४ महिन्याच्या depression नी सगळी राख रांगोळी झाली आहे.
उद्या पासून नवा डाव! आयुष्य नव्यानी सुरु करायचे.
अपेक्षा काही नाहीत आता आयुष्यकडून... फक्त पाठीवर हात ठेऊन लढ म्हणा!!!