गाडीवाटेने जाताना दिसणारा सिंहगड |
इतिहासातील एक पुरातन किल्ला सिंहगड
पुण्याजवळील एक दिवसीय सहलीचे ठिकाण सिंहगड
श्री तानाजी मालुसऱ्यांच्या बलिदानाने पावन झालेला सिंहगड
चविष्ट खेकडा कांदाभजी आणि दही ताक मिळण्याचे ठिकाण सिंहगड
हिंदुपतपादशाहीतील महत्वाचा किल्ला सिंहगड
Weekend ला फिरायला जाण्याचे ठिकाण सिंहगड
सिंहगड या वर काय लिहिणार? नेहमी तर जातेस नवीन काय आहे तिथे...
थोडक्यात काय तर घर कि मुर्गी दाल बराबर... पण आहे ना बाबा... बघायला अनुभवायला हि खूप आहे... चविष्ट खेकडा कांदाभजी आणि दही ताक तर आहेच पण दूरवर दिसणारे राजगड तोरणा... हवामान अगदी चांगले असेल तर अगदी तुंग तिकोना, पुरंदर रुद्रमाळ... बाहू स्फुरण पावतील अश्या मावळ्यांच्या शौर्यगाथा... आणि आधुनिक मानवांनी केलेला कचरा, त्यातल्याच काहींची तो साफ करण्यासाठी चाललेली धडपड. हिमालयात निघालेल्यांची फिटनेस साठी चाललेले प्रयत्न. रोज (हल्ली वीकेंडला) गडावर दही ताक विकणाऱ्या मावश्या आणि अजुन खूप काही...
संध्याकाळी दिसणारे राजगड तोरणा |
श्री शिव छत्रपतींनी आधी श्री शहाजी राजांच्या सुटके साठी व नंतर इसवी सन १६६५ मध्ये पुरंदरच्या तहामध्ये हा महत्वाचा किल्ला गमावला. आणि इसवी सन १६७० मध्ये श्री तानाजी मालुसऱ्यानी बलिदान देऊन हा किल्ला स्वराज्यात आणला. मधल्या काळात किल्ला औरंगजेब आणि मराठे यांच्यात हस्तांतरीत होत राहिला आणि इसवी सन १७७० मध्ये श्री राजाराम छत्रपतींनी येथेच देह ठेवला. १७०३ मध्ये औरंगजेबाने किल्ला जिंकून नाव ठेवले बक्षींदाबक्ष! पुढे मराठे, मुघल आणि निजाम यांच्या या किल्ल्यावर लढाया होत राहिल्या. १८१८ मध्ये जनरल प्रिझलर ने मराठ्यांकडून हा किल्ला जिंकुन घेतला. ब्रिटिश राज काळात लोकमान्य टिळक व अन्य प्रभृतींनी येथे वास्तव्य केल्याच्या नोंदी आहेत.
पुण्यात राहणाऱ्यांकडे कोणी पाहुणे आले कि त्यांना ऑथेंटिक मटका दही आणि खेकडा भजी खाऊ घालायला गाडी पुणे खडकवासला गोळेवाडी मार्गे येते सिंहगडावर. गोळेवाडी ते सिंहगड वाहनतळ असा सुमारे ९ किमी चा घाट पार करून आपण वर पोचतो ते खांदकड्याच्या खाली नवीनच बांधलेल्या वाहनतळावर. आजुबाजुला गडकऱ्यांनी बांधलेली झोपडी कम हॉटेल्स आहेत. या घाटात एक वाट खेड शिवापूरच्या जवळ कोंढणपुर ला उतरते.
पुणे दरवाजा क्रमांक २ |
थोडे वर येऊन, आलो त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे मावळतीला चालु पडायचे. इथे दिसतो तो झुंजार बुरुज. आणि खाली असलेले कळकी मेट. इथे देखील एक दिंडी आहे. करायची थोडी शोधाशोध, सापडते लगेच.
खेकडा भजी |
तानाजी मालुसरे स्मारक |
आलो त्याच चढणीवरून परत फिरलो कि डाव्या हाताला खाली श्री राजाराम छत्रपतींची समाधी बघायची. तिथल्या टाक्यांमधली घाण कुणी तरी मुर्खाने केली म्हणून त्याला नाव ठेवायची, आपल्या हातातली संपलेली पाण्याची बाटली पण तिथेच टाकायची आणि आणि पुढे चालू पडायचे.
पुढे अचानक काही जुन्या प्रकारचे बैठे बंगले दिसतात. यातील एक आहे लोकमान्य टिळकांचा. अरेच्या! असेल काही तरी असं म्हणायचे आणि पुढे निघायचे.
इथून एक वाट पुढे जाऊन पुणे दरवाजा क्रमांक ३ जवळ पोचते, त्या आधी तिथे डावीकडे शौचालये आहेत. फार अपेक्षा ना ठेवता जर गरज असेल तर लाभार्थींनी लाभ घ्यायचा. डावीकडे अफाट पसरलेलं पुणे शहर दिसते.
पिठले भाकरी |
मटका दही |
चढून आणि गडफेरी करून थकला असाल आणि गाडी नाही तरी फिकर नॉट. वाहनतळावर खाली जाणाऱ्या जीप / वडाप मिळून जातील फक्त योग्य तो मोबदला द्यावा हि त्यांची अपेक्षा.
गडावर एक तोफ आहे, पण हा उल्लेख सोडून इतर माहिती टाळली आहे कारण बरेच जण फोटोशूट साठी प्रॉप म्हणुन त्याचा वापर करतात. आणि बघायची असेल तर शोधा कि जरा स्वतःची स्वतः!
आतकरवाडी मधुन एक वाट डोंगराच्या पोटात जाते, तिथे बरेच पक्षी दिसतात, त्यामुळे बरीच "पुण्य"वान मंडळी तेथे पक्षी निरीक्षणासाठी जातात.
खुप जण फिटनेस साठी, हिमालय मोहिमांच्या पुर्वतयारी साठी नियमित येत असतात. कात्रज ते सिंहगड (K2S) हा एक लोकप्रिय ट्रेक आहे तसेच सिंहगड पुण्याजवळ असल्यामुळे व कमी कष्टात गडमाथ्यापर्यंत पोहोचण्याच्या सोयीमुळे खूप वर्दळ असते त्यामुळे अतिशय कचरा होतो. कुठल्याही दुर्गम ठिकाणी पाळण्याचे नियम पाळले तर सहल / गिरिभ्रमण / गिर्यारोहण उर्फ ट्रेक सगळ्यांसाठीच सुखावह होऊ शकतो. निम्नोक्त काही नियम आहेत ते पाळणे गरजेचे आहे जेणे करून आपला हा जैवविविध्याचा आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढयांना सुद्धा अनुभवता येईल.
Follow Us
Were this world an endless plain, and by sailing eastward we could for ever reach new distances