एकदा डोंगरात जायची  चटक लागली  की चढाई -उतराई हि नियमित चालूच राहते. तशी आमची ही चढाई -उतराई चालूच होती, परंतु सगळे धोपट मार्गी ट्रेक्...

कुंडलिका - सावळ-घाट १९ - २० एप्रिल २०१४


एकदा डोंगरात जायची  चटक लागली  की चढाई -उतराई हि नियमित चालूच राहते. तशी आमची ही चढाई -उतराई चालूच होती, परंतु सगळे धोपट मार्गी ट्रेक्स केल्यामुळे काही  विशेष कामगिरी केल्याचे समाधान मिळत नव्हते. म्हणूनच आम्ही अनोख्या  ट्रेकच्या शोधत होतो. कुशलच्या सुपीक डोक्यातून अनेक कल्पना बाहेर पडत होत्या परन्तु उन्हाळ्याचे निमित्त करून आम्ही त्या परतवून लावत होतो. 

अखेर एक दिवस, कुशलने ब्रह्मास्त्र काढले आणि सगळे या लाटेवर स्वार झाले. मुळशी जवळ असलेल्या, कुंडलिका नदीचे मूळ शोधण्याच्या उपक्रमात सामील व्हायला आम्ही सगळे उत्सुक होतो. 

तसे या वर्षामधले बहुतेक treks घाई-घाईत झालेले असल्यामुळे हा trek तरी थोडा निवांत असावा असे आम्ही ठरविले. 

सर्वात प्रथम या भागाची माहिती काढण्याचे काम सुरु झाले. चढाई - उतराई या  पुस्तकामधून बरीच माहिती मिळाली. कुशलने हा trek आधी ३ वेळा केला असल्यामुळे त्याला बऱ्यापैकी माहिती होती. 

हा ट्रेक off -beat  असल्यामुळे आम्ही जास्त लोक नको हे ठरवले, तरी हो - ना करतकरत १६ जणाची  team शनिवारी रात्री चांदणी चौकात जमली आणि ८ दुचाक्यांवर मार्गक्रमण सुरु झाले. पिरंगुट, पौड, माले असे करतकरत आम्ही खालच्या मुळशी मध्ये पोहोचलो. उन्हाळा असलातरी, एक चाय तो बनती है म्हणून एका छोटया break साठी थांबलो . 

रात्री १२:१५ ला परातेवाडी ला पोचलो. लगोलग पथाऱ्या पसरल्या आणि  निद्रेच्या आधीन झालो. 

सकाळी लीडर साहेबांनी ५:१५ ला wake-up call दिला आणि चहाचे आधण ठेवले. चहा उरकून व जास्तीचे सामान गावातल्या एका मामांकडे ठेवुन आम्ही दरीच्या दिशेनी कूच केले. गावातून कोणी माहितगार सोबत घ्यावा असा विचार चालू असताना एका भूभू नी आम्हाला वाट दाखवायला यायची जबाबदारी घेतली. वाटचाल चालु असताना या भूभूचे प्रत्येकांनी आपापल्या मनाप्रमाणे नामकरण केले. 

 डोंगरमाथ्यावर थोडे उलट-पुलट फिराल्यावर कुशलने एके ठिकाणी खाली  उतरण्याची वाट शोधली. आम्ही तिथे जाताना एका छोट्या कातळावर एक  डुरक्या घोणस ऊन खायला येउन पहुडलेला आम्हाला दिसला. एखादया  professional model प्रमाणे त्याने आम्हाला त्याचे photo session करू दिले. 

   आता दरी ची सुरुवात झाली होती… कारण खडकात   खोदलेल्या पायऱ्या आम्ही उतरत होतो.  पुढे एके      ठिकाणी एक खोदीव  पण आता बुजलेले टाके पण  दिसले. आम्हाला  पडलेल्या प्रश्नांना उत्तर देताना  कुशल म्हणाला "हि पूर्वी एक घाट-वाट होती. सावळ-  घाट असे नाव असलेली. परातेवाडी, वान्द्रे, वडूस्ते आणि निवे गावातील लोक या घाटाचा उपयोग भिरा येथे जाण्यासाठी करत असत. "

या पुढची वाट रानामधली असल्यानी उतार  पटकन लक्षात  आला नाही. अजून थोडे पुढे गेल्यावर एके ठिकाणी पायऱ्यांच्या बाजूला अजून एक स्वच्छ पाण्याचे टाके होते. आम्ही आमच्या water bags  तिथे परत  भरून घेतल्या आणि एका छोट्या विश्रांती नंतर मार्गस्थ झालो. या टाक्याच्या थोड्या अलीकडेच या वाटेने आपले पायवाटेचे रूप बदलून नळीच्या वाटेचे रूप घेतले होते… जंगलातील वाट असल्या कारणाने उन्हाचा तडाखा बसत नवता, परंतु दमट हवेमुळे उष्णता जाणवत होती. कोण्या एका अनामिक trekking club / trekker ने इथे मार्गदर्शक खुणा करून ठेवल्या असल्याने रस्ता चुकायची तशी भीती नव्हती. 

जवळपास ३ तासांच्या उतराई नंतर आम्ही कुंडलिकेच्या पात्राजवळ पोचलो. उजवीकडे नावजी आणि कुंडलिका या सुळक्यांनी दर्शन दिले. आणि आता दरीमध्ये traverse सुरु झाला. आता सर्वांच्या पोटात कावळ्यांनी जन्म घ्यायला सुरुवात केली होती. 

स्वच्छ पाण्याच्या पहिल्या साठ्याजवळ आम्ही नाष्टया साठी चूल मांडली. पोळेकरसरांनी मंत्र म्हटले आणि अंकिता आणि कुशल ने आहुती देत आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक आमचा हस्तक्षेप दूर ठेवत अतिशय चविष्ट उपमा बनवला. (Trust me: Too many cooks spoil the broth.)

नाश्त्याच्या या विश्रांती नंतर पुढची वाटचाल म्हणजे पुन्हा थोडी चढाई होती. पोटोबा झाल्यावर हे अतिशय अवघड असते. साधारणपणे एक तासभर चालल्यावर पाण्याचे कुन्ड दिसायला लागले… एका मोठ्या कुंडामध्ये मुलांनी उड्या मारायला सुरुवात केलेली  बघून अंकिता आणि मी मागे वळालो. 
थोडे अंतर उलट आल्यावर,  गिर्यारोहणाचे नियम काठावर ठेऊन मी आणि अंकिता सुद्धा एका डबक्यामधे शिरलो. थोडा वेळ जलक्रीडा झाल्यावर आम्ही आवरले व मुलांना आवाज दिला. आम्ही वेळेचे भान विसरल्यामुळे बिचारे आधी आवरून सुद्धा अडकून राहिले होते. सकाळी जिथे चुल लावली होती तिथे परत आल्यावर खिचडीच्या प्रसादाचा कार्यक्रम सुरु झाला. बिरबलाची खिचडी शिजेपर्यंत सर्वांच्या दप्तरामधील खाऊ बाहेर आला आणि वळीवाच्या पावसाने चाहूल द्यायला सुरुवात  केली. I am again telling you: Too many cooks spoil the broth. 

पटापट भोजनचा कार्यक्रम आटोपून आम्ही परतीचा मार्ग धरला. पून्हा ती नळीची वाट चढणे आता जीवावर (पोटावर) येउ लागले होते. 

जाणकार आणि स्वस्थ गण पुढे आणि मी शेवटी असे करत करत आम्ही पुन्हा सकाळच्या पायऱ्याजवळ  पोचलो. पठारावर आल्यावर मावळतीला अत्यंत मोहक सह्याद्री आणि त्यामागे अस्ताला जाणारा सुर्य… डोळे भरून हे दृश्य पाहून आम्ही गावाकडे वाटचाल सुरु केली. 

संधीप्रकाशात करवंदीच्या जाळी मधले पिकलेले गोड करवंद खात आम्ही परातेवाडी मध्ये पोचलो तोवर काळोख झाला होता. मामांकडून सामान व चहा घेऊन आम्ही पुण्यासाठी रवाना झालो.
**********************************************************************************************************************************
घोणस आणि अजगर
  
नाष्ट्याच्या वेळेला मोती भलताच लाडात आला.
  
आमचा वाघ 
   
 लई गोड मैना डोंगरची काळी काळी मैना 

तळटीप: 

या trek सोबतच  plus valley, कैलासगड, अंधारबन असे treks करता येतील.